You are currently viewing अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत

अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत

– निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे                            

सिंधुदुर्गनगरी

जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य यांची शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी दिनांक 23 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

     मा. पंतप्रधान यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमातील निर्देशानुसार राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुहाच्या समस्यांचे निराकरण करणे, तसेच त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती करीता जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी (प्रामुख्याने ग्रामीण तसेच नागरी भागातील अल्पसंख्यांकांच्या कल्याणाशी संबंधित) व अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या प्रत्येकी 1 प्रमाणे नामवंत संस्थांचे 3 प्रतिनिधी यांचा अशासकीय  सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीवर कार्यारत असलेल्या सदस्यांची शासन निर्णयानुसार नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीवर 3 अशासकीय सदस्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तरी संबंधितांनी दिनांक 23 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत. दिनांक 23 डिसेंबर 2020 नंतर येणाऱ्या अर्ज , प्रस्ताव यांचा विचार केला जाणार नाही असे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा