You are currently viewing जलजीवन मिशन अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील ४४ हजार १९३ कुटूंबांना नळ कनेक्शन देण्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करा

जलजीवन मिशन अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील ४४ हजार १९३ कुटूंबांना नळ कनेक्शन देण्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करा

आ. वैभव नाईक यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सूचना

जलजीवन मिशनच्या कृती आराखडयाबाबत २१ जानेवारी रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटूंबाला नळ कनेक्शन देण्याचे धोरण आहे. ०१ मार्च २०२० पर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ३३ हजार ९५४ कुटुंबांपैकी २४ हजार ३९९ कुटुंबांना नळ कनेक्शने मिळालेली नाहीत तर ९ हजार ५५५ कुटूंबांना नळ कनेक्शने देण्यात आली आहेत . मालवण तालुक्यात एकूण २६ हजार ९२३ कुटुंबांपैकी १९ हजार ७९४ कुटूंबाना नळ कनेक्शने मिळालेली नाहीत तर ७ हजार १२९ कुटूंबांना नळ कनेक्शने देण्यात आली याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत लवकरात लवकर उर्वरित कुटूंबांना नळ कनेक्शने देण्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करा नळजोडणी पासून कोणीही वंचित राहू नये यासाठीचे नियोजन करा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी बैठकीत दिल्या.
प्रत्येक घरात नळ जोडणी करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने जलजीवन मिशन कार्यक्रम २०२०- २१ राबविला जात आहे. या मिशन अंतर्गत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून ज्यांच्या घरात नळ कनेक्शन नाही अशा सिंधदुर्ग जिल्ह्यातील सर्व गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी साठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितल्याचे आमदार वैभव नाईक यांनी बैठकीत सांगितले. या मिशनसाठी अधिकारी कर्मचारी देण्याची मागणी आपण केली आहे. त्या मागणीला ना. गुलाबराव पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.त्यामुळे ज्या कामांची अंदाज पत्रके झाली आहेत त्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करा. जलस्वराज्य मध्ये ज्या चुका झाल्या त्या जलजीवन मिशन मध्ये नको, येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ना. गुलाबराव पाटील यांचा सिंधुदुर्ग दौरा होणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी प्र. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड, मुख्यकार्यकारी अधीकारी डॉ.हेमंत वसेकर, जिल्हा प्रकल्प संचालक विनायक ठाकूर, विविध विभागाचे अधिकारी श्रीपाद पाताडे,डॉ.विजय नांदेकर,नंदकिशोर बल्लाळ, मंगलदास चोडणकर,सिद्धन्ना म्हेत्रे, रामचंद्र आंगणे, श्री.देसाई, निमंत्रित सदस्य भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =