मठबुद्रुक पाणलोसवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सभामंडपाचे भूमिपूजन
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

मठबुद्रुक पाणलोसवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सभामंडपाचे भूमिपूजन

मालवण

मठबुद्रुक पाणलोसवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तर शिवउद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गावकर, यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी आमदार फंडातून १२ लाख रु. चा निधी या सभामंडपासाठी मंजूर केला आहे. यावेळी गावातील विकासकामांचा त्यांनी आढावा घेत, समस्या जाणून घेतल्या. येत्या काळात उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याची ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.
याप्रसंगी मालवण न.पं. चे नगरसेवक मंदार केणी, आडवली मालडी विभाग प्रमुख दीपक राऊत,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख अरुण लाड,दक्षता समिती सदस्य बंडू चव्हाण,अनिल गावकर, समीर लब्दे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, मठबुद्रुक पाणलोस सरपंच उमेश पेडणेकर, अंनत बाईत, बंडू गावडे, दुलाजी परब, विश्वनाथ बाईत, सुनील बाईत, उल्हास बाईत, रघुनाथ मुळये, विलास बाईत, चंद्रकांत घाडी, शामसुंदर घाडी, अभय सरमळकर, दीपक सावंत, स्वप्नील बाईत, बाबा घाडी, बी.डी कांबळी आदींसह ग्रामस्थ होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा