वेंगुर्ला चर्मकार समाजाच्या युवा अध्यक्षपदी रोहित वेंगुर्लेकर यांची निवड…
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, वेंगुर्ला युवा समितीच्या अध्यक्षपदी माणिक चौक येथील युवा व्यापारी रोहित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. वेंगुर्लेकर यांचा व्यवसायाबरोबर समाजाच्या कामात नेहमी चांगला सहभाग असतो. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजाची ही नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ वेंगुर्ला तालुका शाखेची सभा नुकतीच पार पडले या सभेमध्ये जिल्ह्याच्या वतीने जिल्हा संघटक म्हणून गुरुप्रसाद चव्हाण यांची तर वेंगुर्ले युवा तालुकाध्यक्ष म्हणून श्री.रोहित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी दोघांनाही जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सूचित जाधव सचिव चंद्रसेन पाताडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि वेंगुर्ला तालुक्यातील समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समाजाचा व्यवसाय नव्या पिढीपर्यंत ही सुरू ठेवल्याबद्दल रोहित वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. तर समाजातील युवा पिढीला एकत्र करून संघटनेची नवीन मोट बांधणार असल्याचे वेंगुर्लेकर यांनी या निवडीनंतर बोलताना सांगितले.