*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
🔥🔥*होलिका*🔥🔥
दरवर्षी होळी आली ना की येतात…
तिरस्काराची लाकडं
मत्सराच्या गोवर्या
हेव्यादाव्याचं गवत
टम्म शब्दांच्या भिंगर्या
कठीणच आहे सगळं
शब्दांचं गौडबंगाल
मनांचं मायाजाल !!
कठीणच आहे सगळं
होळीच रुपक लोकांना कळणं
कशाचं जाळणं कशाचं जळणं!!
खरंच ना ……..
लोकांना एवढंच कळतं
फक्त होलिकेचं मरणं
कधी लक्षातच येत नाही
प्रल्हादाचं जिवंत उरणं!!
मला दोनच होळ्या माहिती आहेत
एक सत्य वा कृतयुगातील होळी
आणि दुसरी कलियुगातील होळी !!!
सत्ययुगातील होळी विसरले कुणीच नाही
पण कलियुगातील होळी लक्षात कुणाच्याच नाही!!
इंग्रजांचं राज्य असतांना भारतभर झालेली
विदेशी कपड्यांची होळी
आणि
आमच्या स्वातंत्र्यवीरांनी
भारतमातेसाठी केलेली
आयुष्याची राखरांगोळी !!
हीच खरी कलियुगातली होळी !!
कृतयुग काय वा कलियुग काय
भिन्नच होतं सगळं जाळणं आणि जळणं
पण तुम्हाला सांगू का बंधुभगिनींनो
कठीणच आहे सार्यांना होळीचं कळणं!!
होळी केंव्हाचीही असू द्या
मानसिकता ही भिन्नच होती
पण होळीचा धागा समान होता
भक्ति हृदयात जिवंत होती !!
तेंव्हा होता प्रल्हाद
आता होते स्वातंत्र्यवीर
भक्ती होती सणात म्हणून
जिवंत सनातनी हिंदवीर !!!
काय जाळायचं अथवा नाही
कळलं नाही तरी चालेल
उत्सवात भक्ती जिवंत ठेवा
नारायण काय भारतमाताही पावेल !!!
🔥🔥🔥🔥🔥
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नाशिक , ९८२३२१९५५०