नगरसेवक परिषदेच्या सिंधुदुर्ग संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर…

नगरसेवक परिषदेच्या सिंधुदुर्ग संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर…

वेंगुर्ला

महाराष्ट्र नगरसेवक परिषद-मुंबई या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र परिषद संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी श्री.वेंगुर्लेकर यांना प्रदान केले
श्री. वेंगुर्लेकर हे आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्गचे सचिव म्हणून कार्यरत असून जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत.आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवीत असून सुमारे पंधरा विविध संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा