खांबाळे टेंबवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ..

खांबाळे टेंबवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ..

ना.उदय सामंत व खा.विनायक राऊत यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन दिला निधी..

वैभववाडी

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत व शिवसेना संसदीय गटनेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी ‘जिल्हा वार्षिक योजना’ या निधीतून खांबाळे टेंबवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या कामाचा शुभारंभ आज दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक अशोक पवार, बाबा पवार, सरपंच विठोबा सुतार यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले.

या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन दीपक चव्हाण, सरपंच सारिका सुतार, टेंबवाडी शाखाप्रमुख सत्यवान सुतार, दत्तात्रय परब, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य गणेश पवार, प्रवीण गायकवाड, राजेंद्र देसाई, दीपक पवार, प्रसाद कदम, संजय सुतार, बाबा गुरव, रामदास पवार, प्रदीप देसाई, रत्नाकर पवार, संकेत पवार, शरद पवार, प्रकाश लांजवळ, सुधाकर साळुंखे, विनायक पवार, दिलीप पवार आदी शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा