You are currently viewing केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सौ.निलम नारायण राणे

केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सौ.निलम नारायण राणे

वाढदिवस अभिष्टचिंतन…

सौ निलम नारायण राणे…. नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासात जे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे त्यांच्या सुविध्य पत्नी सौ निलमताई… नारायण राणे यांचे निकटवर्तीय आणि राजकीय क्षेत्रातील राणे परिवाराशी संबंधित काही जण त्यांना ताई तर कोणी वहिनी म्हणून ओळखतात. परंतु राणेंशी जवळीक असलेल्यांची तर त्या माऊली आहेत.
नारायण राणे यांच्यापासून ते सर्वसामान्य राणे प्रेमींना निलम ताई ह्याच आधार वाटतात. त्यांच्या विषयी बोलण्यास आणि व्यक्त व्हायला भावनाही कमी पडतील अशाही प्रतिक्रिया अनेक जण व्यक्त करतात. महिला बचत गटांच्या अनेक महिलांना निलमताई ह्या आधार वाटतात. मातोश्री वृद्धाश्रमात सुद्धा निलमताईंचा वावर हा आईसारखाच असतो. वृद्धाश्रमातील वृद्ध सुद्धा त्यांचाविषयी बोलताना सांगतात की, लहानपणी जशी आई भेटलेली तशीच आयुष्य अस्ताकडे जाताना आम्हाला आई भेटली. वृद्धाश्रमातील वृद्धांना सुद्धा निलमताई प्रेम देतात, माया लावतात. त्यामुळे वृद्धाश्रमातील अनेकजण त्यांना आपल्या हृदयात मानाचं स्थान देतात.
सिंधुदुर्गात महिला बचत गटासाठी त्यांनी निलमताईंनी फार मोलाचे काम करत अनेक महिलांना स्वबळावर उभे राहण्यास ताकद दिली आहे. पडवे, कसाल येथे उभारलेल्या लाईफ टाइम हॉस्पिटल च्या उभारणीत सुद्धा त्यांचे मोठे योगदान आहे. नारायण राणेंच्या साथीने हॉस्पिटल उभारणीसाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतली आहे, त्यामुळेच जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्यातच सर्व प्रकारचे उपचार मिळण्यास सुरवात झाली आहे. कोरोनाच्या काळात लाईफटाईम हॉस्पिटल अनेकांसाठी आधार ठरले होते.
नारायण राणेंसोबत वावरताना जनता हेच आपले कुटुंबीय म्हणून त्यांनी समाजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. नारायण राणे यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची त्या आस्थेने विचारपूस करतात. त्यामुळे निलमताई ह्या अनेकांच्या हृदयात आपली एक वेगळी जागा बनवून आहेत.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा असलेल्या निलमताईंचा आज वाढदिवस….! माऊली सारख्या अनेकांना आधार वाटणाऱ्या, वृद्धांना सुद्धा आईप्रमाणे प्रेम देणाऱ्या, निलमताईंना संवाद मीडिया कडून वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा….

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − one =