असलदे बौद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

असलदे बौद्धवाडी रस्त्याचे भूमिपूजन

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला रस्ता

कणकवली

कणकवली तालूक्यातील असलदे बौध्दवाडी येथील रस्ता अनुसूचित जाती व जमाती व नवबौध्द घटाकांचा विकास करणे सन २०२०/२१ अंतर्गत आम.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी जि.प.सदस्य संजय देसाई, पं.स.सदस्या हर्षदा वाळके, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, सोसा.चेअरमन प्रकाश परब, ग्रामसेवक आर.डी.सावंत, संतोष घाडी, ग्रा.पं.सदस्य दिनकर दळवी, ग्रा.पं.सदस्या वंदना हडकर , निलिमा तांबे, विलास कांडर, अनिल तांबे, सुनिल तांबे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, अनंत तांबे,दिपेश तांबे,मिलिंद तांबे, चंद्रकांत तांबे, संतोष तांबे, सुरेश मेस्त्री व असलदे बौध्दवाडी येथील ग्रामस्थ उपस्थीत होते.

सदर रस्ता आम.नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून यासाठी जि.प.माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटया सावंत, जि.प.सदस्य संजय देसाई यांनी ही यासाठी प्रयत्न पाठपुरावा केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा