You are currently viewing सावंतवाडीतील श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडीतील श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडीतील श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न…

सावंतवाडी

येथील जागृती देवस्थान आणि ३६५ खेड्यांच्या अधिपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री देव उपरलकराचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती. सकाळ पासून सायंकाळी उशिरा पर्यत दर्शनाची रांग सुरू होती.

सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे. यावर्षीही सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ पार पडला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक येथील भाविकांनी श्री देव उपरलकराच्या दर्शनासाठी सावंतवाडीत हजेरी लावली होती.दरम्यान, या निमित्ताने नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम व महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयाेग आयोजित करण्यात आला होता

प्रतिक्रिया व्यक्त करा