You are currently viewing तालुक्यातील संजय गांधी अनुदान योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव २४ मे पर्यंत तहसीलदार कार्यालयात सादर करा – अशोक दळवी

तालुक्यातील संजय गांधी अनुदान योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव २४ मे पर्यंत तहसीलदार कार्यालयात सादर करा – अशोक दळवी

२५ मे रोजी समितीची सभा आयोजित

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका संजय गांधी अनुदान योजना समितीची सभा बुधवार 25 मे रोजी प्रस्तावित आहे ज्या पात्र लाभार्थी यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना योजनेंतर्गत अर्ज सादर करावयाचे असतील अशा लाभार्थीनी परिपूर्ण प्रस्ताव मंगळवार 24 मे दुपारपर्यंत तहसिलदार कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत सादर करण्याचे आवाहन अध्यक्ष अशोक राजाराम दळवी व सदस्य सचिव तथा तहसिलदार सावंतवाडी श्रीधर पाटील यांनी केले आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक: जन्मतारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मनोंद दाखला, शाळा सोडल्याचा दाखला प्रवर्गाचा पुरावा (विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला, दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सकाचा दाखला, घटस्फोटित असल्यास मा. न्यायालयाच्या आदेशाची प्रत) शिधापत्रिकेची साक्षांकित प्रत, उत्पन्न अथवा दारिद्ररेषेखालील दाखला, मुलांचे जन्मनोंद / शाळा सोडल्याचे दाखले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + four =