You are currently viewing मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान

मुणगे येथे श्री भगवती देवस्थान कडून गुणवंतांचा सन्मान

स्वप्नांचा पाठलाग करताना यशात सातत्य ठेवा; दिलीपकुमार महाजन यांचे प्रतिपादन

देवगड :

मागील सतरा वर्ष श्री भगवती देवस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम चालू आहे. देवस्थानने शैक्षणिक तसेच आरोग्य साठी निधी उपलब्ध करून ठेवला आहे. आजचे विध्यार्थी भाग्यवान आहेत ज्यांचा सन्मान सर्वांच्या श्रध्दास्थानी असलेल्या आई भगवती देवालयात झाला आहे. भविष्यात यापेक्षाही मोठे सन्मान तुमचे होतील पण आजचा सन्मान तुमच्या आठवणीत राहील. मोठे झाल्यावर गावचे नाव रोशन करा. विध्यार्थ्यांनि सोशल मीडियाचा कमीतकमी वापर करावा. स्वप्नांचा पाठलाग करून मिळालेल्या यशात सातत्य ठेवा असे प्रतिपादन देवस्थानचे माजी सचिव दिलीपकुमार महाजन यांनी येथे केले.

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थानच्या वतीने गावातील पहिली ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव कार्यक्रम श्री भगवती देवालय येथे झाला त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ साक्षी गुरव, देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निशाद परुळेकर, श्री भगवती हायस्कुल मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, माजी सचिव दिलीपकुमार महाजन आदी उपस्थित होते.

सरपंच सौ साक्षी गुरव यांनी देवस्थानच्या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक करत मोठे यश मुलांनी मिळवावे असे सांगितले. माजी विश्वस्थ आबा पुजारे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी आणखी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. यावेळी एम बी कुंज, मंगेश हिर्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रामतीर्थ कारेकर, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, अनिल धुवाळी, कृष्णा सावंत, प्रमोद सावंत, दिगंबर पेडणेकर, गणपत दळवी, सुरबा सावंत, संतोष पाडावे, राजाराम धुरी, अशोक रूपे, हेमंत धुवाळी, मोहन परब, लक्ष्मण घाडी, रवींद्र आईर, लक्ष्मण मेस्त्री, विश्वास मुणगेकर, रमेश परब, मंगेश हिर्लेकर, आरोग्यसेविका श्रीमती चराटकर, सौ वारंग मॅडम, तसेच शिक्षक, ग्रामस्थ, उपस्थित होते. आभार देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा