सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा ०८ रोजी
मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे – सीताराम उर्फ दादा कुडतरकर
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ते दुपारी ०१.०० वाजताचे मुदतीत श्री. वासुदेवानंद सरस्वती सभागृह, आर. एस. एन. हॉटेलच्या पाठिमागे, उद्यमनगर, कुडाळ येथे “सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा” हा नाविण्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अडचणींच्या वेळी त्वरीत पोलीसांची मदत व्हावी, तक्रारीचे योग्य प्रकारे निरसण व्हावे, कायदेविषयक तरतुदी, शासनाच्या विविध योजना, सायबर क्राईम व अन्य प्रकारे आर्थिक फसवणूक, आरोग्य विषयक अडचणी इत्यादीमध्ये सविस्तर मार्गदर्शन होऊन त्यांची सुरक्षितता अबाधित राहून आयुष्य निर्भयपणे सुखकर व्हावे आणि पोलीस आणि प्रशासनाशी थेट सुसंवाद व्हावा याकरीता “सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनचे उद्घाटन” होणार आहे.
–
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नाम. श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली होणार असून मा. नाम. श्री. नारायण राणे, खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, मा. श्री. निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य, मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषद सदस्य, मा. श्री. दिपक केसरकर, आमदार, सावंतवाडी विधानसभा, मा. श्री. निलेश राणे, आमदार, कुडाळ विधानसभा, मा. श्री. संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, मा. श्री. अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मा. श्री. मकरंद देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग याचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर उपक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वैदयकिय तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक, आर्थिक गुंतवणूकीबाबत, विविध शासकीय योजना, सुरक्षितताविषयक माहिती देण्यात येणार आहे. महत्वाच्या अडचणींचा उहापोह करुन तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या ज्येष्ठ नागरीकांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
तरी सदर मेळाव्याचे उपक्रमास आपण स्वतः उपस्थित राहून जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित ठेवण्याची विनंती केली आहे.
तरी पोलीस विभाग सिंधुदुर्ग यांचे वरील विनंतीस भरघोस प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील सर्व सन्माननीय जेष्ट नागरिक,पदाधिकारी यानी मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर जिल्हा समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले आहे