आनंद लाड यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ताजी सामंत यांची भेट घेऊन महावितरण कंत्राटी कामगारांच्या अडचणी बाबत केली चर्चा
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ रत्नागिरी सिंधुदुर्ग झोन अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री दत्ताजी सामंत यांची भेट घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण कंत्राटी कामगारांच्या अडचणी बाबत चर्चा केली. कुडाळ मालवण मतदान संघाचे आमदार माननीय श्री निलेशजी राणे साहेब यांची व संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी त्यांची बैठक लावण्यासाठी विनंती करण्यात आली.
यावेळी सामंत साहेब यांनी लवकरात लवकर संघटनेचे पदाधिकारी व निलेश राणे साहेब यांची बैठक लावून महावितरण कंत्राटी कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावू व कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही असा शब्द दिला.