You are currently viewing डॉ. सुभाष बागल यांचा महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभहस्ते सन्मान

डॉ. सुभाष बागल यांचा महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभहस्ते सन्मान

मुक्ताईनगर :

छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, कवी तथा शिवचरण उज्जैनकर फाउण्डेशनचे राज्याध्यक्ष डाॅ. सुभाष बागल यांच्या ‘ संत तुकारामांचे अभंग : एक चिंतन’ या ग्रंथास मुक्ताईनगर जि. जळगाव येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्गमय निर्मितीचा पुरस्कार देवाची आळंदी येथे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड व कवी विलास सिंदगीकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेमार्फतही त्यांचा या ग्रंथाबद्दल नुकताच सन्मान करण्यात आला या ग्रंथास अहिल्यानगर येथील शब्दगंध साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. डाॅ. सुभाष बागल यांच्या संत साहित्यावरील या ग्रंथाची महाराष्ट्रभर चर्चा आहे. याची दखल घेऊन जालना येथे संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महाचिंतणीच्या समारोपीय समारंभामध्ये राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विचारपीठावर माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री, आमदार अर्जुनरावजी खोतकर, आमदार अनुराधाताई चव्हाण, महाचिंतनी जनक बा. भो. शास्त्री, संजीवनी हॉस्पिटलचे मुख्यसंचालक डॉ. बळीराम बागल यांची प्रमुख उपस्थिती होते. याबद्धल डॉ. सुभाष बागल यांचे साहित्य वर्तुळाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा