पुणे :
महाकवि कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फेतर्फे दरवर्षा प्रमाणे दि. 2.2.2025 (रविवार) रोजी वसंत पंचमी निमीत्त सरस्वती पूजनाचा व लोकसंस्कृतीच्या स्मृती जागवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी आपल्या स्मरणातील एखादे लोकगीत, भोंडला, हदगा, पिंगळा, वासुदेव, जात्यावरची ओवी, भारुड, उखाणा, अभंग, आरती, बडबडगीत, खेळ गीत, पोवाडा आणि लोकगीताच्या लयीत रचलेल्या कविता सर्व मान्यवर कवी/ कवयित्री यांनी आपल्या सादरीकरणातून अत्यन्त उत्साहात सादर करून या वर्षीच्या वसंतोत्सवाचे औचित्य साधून *सरस्वतीचा पूजन सोहळा *स्कॉउट ग्राउंड पुणे येथे पार पडला.*
लोकगीते हा भारतीय साहित्यातील प्राचीन कलासंस्कृतीचा समृद्ध आणि श्रीमंत ठेवा आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक भावकवी वि.ग. सातपुते यांनी काढले.
या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष काकासो चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष डॉ. प्रा. महेंद्र ठाकुरदास यांनी लोककला , लोकसंस्कृती आणि त्याची आज असणारी सामाजिक गरज आणि त्यातून होणारे संस्कार या बाबत विवेचन केले . याप्रसंगी उपाध्यक्ष ऍड. संध्या गोळे , ऋचा कर्वे , मकरंद घाणेकर , सौ. राधिका दाते , यशवंत देव , सुरेश शेठ , डॉ. लक्ष्मण शिवणेकर ,किरण जोशी , पुष्पा कुलकर्णी, अंजली महाजन , मीना सातपुते , ज्योती सरदेसाई मनिषा आवेकर , राजश्री सोले , अश्विनी पिंगळे , शांतीलाल ननवरे , प्रतिभा पवार अशोक भांबुरे , सुनीता टिल्लू , शुभदा उदगावकर , सतीश शिंगवेकर ,तेजल चव्हाण , मंगल आपटे , केतकी देशपांडे , अपर्णा आंबेडकर , मिनाक्षीताई नवले , साधना शेळके, विजय जाधव , मृदुला कुलकर्णी डॉ. कन्नुलाल विटोरे , श्री संभाजी , नंदकिशोर गावडे , शोभा देशपांडे , बाबासाहेब ठाकूर. जयंतराव देशपांडे. जयश्री श्रोत्रीय , अनील कुलकर्णी, वंदना पुरोहित , जया ठाकुरदास , प्रभावती कुलकर्णी , डॉ. दाक्षायणी पंडित , ऍड. प्रार्थना सदावर्ते. ऍड. उमाकांत अदमाने यांनी आपल्या रचना सादर केल्या. कवियत्री ऋचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. राधिका दाते यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.