MSME मंत्रालयाकडून नवा अभिनव उपक्रम…

MSME मंत्रालयाकडून नवा अभिनव उपक्रम…

 

स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी खादीची चप्पल आणि बूट लॉन्च केले आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी MSME मंत्रालयाकडून नवा अभिनव उपक्रम राबवला जात आहे.

 

सणउत्सव काळात देशाच्या विविध भागात खादीचे कपडे, मास्क आणि अन्य साहित्यांची रेलचेल आहे. यातच नव्या ट्रेंडनुसार सणासुदीच्या काळात लोकांची खादीला पसंती असते. हीच संधी हेरुन गडकरींनी खादीची चप्पल आणि बूट बाजारात आणले आहेत. हे बूट आणि चप्पल नक्कीच लोकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे.

 

बदलत्या ट्रेंडनुसार लोक खादीचे कपडे पसंत करतात. आता आम्ही खादीची चप्पल आणि बूट दोन्ही बाजारात आणले आहेत. पुरुष आणि महिला वर्गासाठी दोन्ही वस्तू उपलब्ध असतील जे लोकांच्या पसंतील पडतील, असं गडकरी म्हणाले.

 

सण-महोत्सवाच्या काळातलोकांना स्थानिक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’मध्ये बोलताना, खादी आता जगात एक ओळख बनवत आहे, तसेच ते फॅशन स्टेटमेंट बनले आहे, असं मोदी म्हणाले होते. तसंच याच संबोधनात बोलताना त्यांनी खादीच्या वाढलेल्या विक्रीबद्दल भाष्य केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा