पुणे :
साहित्य सम्राट पुणे व स्नेह कलाविष्कार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कलाविष्कारचा वर्धापन दिन व आमदार चेतन तुपे यांच्या वाढदिवसा निमित्ताने कवी आणि गायक यांची शब्द सूरांची मैफिल विठ्ठल तुपे नाट्यगृह येथील सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अष्टुळ म्हणाले की,
कवींमुळे शब्द मिळतात, शब्दांमुळे सूर भेटतात,
सुरांचे मग गीत बनते आणि गीतांमुळे सुरांची मैफिल सजते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड कवी गायक चंद्रकांत गायकवाड (माजी पोलीस अधिकारी) प्रमुख पाहुणे गीतकार कवी संजय मांगाडे (माजी पोलीस अधिकार), मुख्य आयोजक गायक कवी राम सर्वगोड आणि कवी विनोद अष्टुळ शब्दसूरांच्या मैफिलीच्या विचारपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड म्हणाले की, एकत्र आलेल्या शब्द आणि सुरांनी गीतांचा जन्म होतो. शब्द, सुर, ताल आणि संगीत यांचा संगम म्हणजे शब्द सूरांची मैफिल. अशा मैफिलीतील सुंदर कवितांनी मन तृप्त झाले.
शब्द आणि सुर अशा रंगतदार मैफिलमध्ये निमंत्रित कवी किशोर टिळेकर, कवयित्री शरयू पवार, चंद्रकांत जोगदंड, रानकवी जगदीप वनशिव (निवेदक पत्रकार) आनंद गायकवाड (गायक कवी), सूर्यकांत नामगुडे (कवी), निरंजन ठणठणकर (कवी), प्रेमकवी सुरेश धोत्रे, जितेंद्र सोनवणे, हभप बडधे महाराज, पांडुरंग धोत्रे, सतीश शिंगवेकर, प्रतिभा उंडे, ऋषीकेश भोसले (पत्रकार), राजेद्र भिसे (गायक), सुरेश लोखंडे (कवी), विनोद ताम्हणे (गायक कवी), किर्ती देसाई (गायिका), गिताजंली देवळकर (गायिका) दिलीप मोरे, अजय खंडागळे, राजेंद्र कुलकर्णी, राम सर्वगोड आणि विनोद अष्टुळ अशा अनेक गायक, गायिका, कवी आणि कवियित्री यांनी आपली जुनी नवीन बहारदार सुप्रसिद्ध मराठी हिंदी गाणी व कविता सादर करून रसिक हडपसरकरांची मने जिंकली.
हि शब्द सूरांची मैफिल अशीच कायमस्वरूपी चालू राहणार आहे. असे गायक कवी राम सर्वगोड यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले.