You are currently viewing तोंडवली समुद्रकिनारी रोटरॅक्ट क्लब कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून राबविली स्वच्छता मोहीम

तोंडवली समुद्रकिनारी रोटरॅक्ट क्लब कणकवली सेंट्रलच्या माध्यमातून राबविली स्वच्छता मोहीम

कणकवली :

रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे २ ऑक्टोबर रोजी कोस्ट टू कोस्ट या उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकाच दिवशी भारताच्या मेंगलोर, कारवार, उडपी अशा विविध भागात हा उपक्रम राबविला गेला. मालवण तालुक्यातील तोंडवळी या समुद्रकिनारी या अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रोटरॅक्ट क्लब कणकवली आयोजित या स्वच्छता अभियानाला नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्ग तसेच तोंडवली ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.

स्वच्छता अभियानामागील प्रेरणा असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील काचबाटल्या, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या तसेच इतर कचरा एकत्र करत समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली. या स्वच्छता अभियानात रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा श्रद्धा पाटकर, सेक्रेटरी मिहिर तांबे, राजस परब, नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्गचे क्रांती जाधव, पियुषा जाधव, साक्षी घाडीगावकर, तोंडवली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रकाश सुतार, सुरेंद्र धुरत, राजाराम पाटील आदींनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता अभियानासाठी तोंडवळी गावचे सरपंच तुकाराम कांदळकर, असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेट्ये यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा