कणकवलीत युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कणकवलीत युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश

अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंढवा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

कणकवली :

कणकवली येथे हॉटेल अनंत मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसची सभा पार पडली. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे प्रभारी प्रदीप सिंढवा यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शंभूराजे देसाई महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव निखिल कांबळे जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे कणकवली तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली  जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत कणकवलीत तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदींसह जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी किरण टेंबुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी म्हणाले की जिल्हा युवक काँग्रेस जोमाने वाढविण्यात येईल आजच्या उपस्थितीवरून युवक कांँग्रेस वाढत आहे असं दिसून येत आहे.

प्रदीप सिंढवा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रातील मोदी सरकार जे काही निर्णय घेत आहेत. हे युवकांसाठी व पुढील पिढीसाठी घातक आहे. आज दिवसेंदिवस वाढत असलेली बेरोजगारी सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक वस्तू यांचे वाढलेले भाव शेतकरी गेले दोन महिने दिल्लीच्या बोर्डवर करत असलेले आंदोलन पेट्रोलची दरवाढ हे देशाच्या भवितव्यासाठी धोक्याच आहे, हे ओळखून युवकांनी यांच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. यानंतर शंभूराजे देसाई निखिल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कणकवली तालुक्यातील इतर पक्षांतील युवक कार्यकर्त्यांनी युवक कॉंग्रेसमध्ये या वेळी पक्षप्रवेश केला.

या वेळी शहराध्यक्ष निलेश तेली देवगड एन एस यु आय तालुकाध्यक्ष सुरज घाडी किरण हळदणकर निखिल तारी आणि असंख्य युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा