*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
__________________________
श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना, काव्यपुष्प- ७ वे
_________________________
जीवनाचे सार जाणुनी घेऊ । रहाटगाडगे विसरुनी जाऊ ।
सुटका यातुनी करून घेऊ । चला हो शरण समर्था जाऊ ।।१।।
खोट्या स्वप्नी आम्ही रमतो । फसव्या सुखात आम्ही हसतो।
भ्रमात रहातो । सुखलोलुप जीव आमुचा ।। २ ।।
अज्ञानाचे पटल गडद सारे । भ्रमवी मनास हर तऱ्हे । चित्ती सदा अस्थिर वारे । गोंधळ ऐसा जीवाचा ।। ३ ।।
यावरती आहे एक उपाय । आठवावे श्री सद्गुरू पाय ।
हाच तरणोपाय । साऱ्या समस्येवरील ।। ४ ।।
स्वामी-लीला -कथासार । आहे मोठा अपार । भक्तीचा हा भाव-संसार । आहे मोठा रसाळ ।।५ ।।
अवधूत-स्वरूप । स्वामींचे दत्त रूप । भक्तांसाठी अप्रूप।
स्वामीदर्शन ।। ६ ।।
स्वामी समर्थांचे जीवन सारे । भक्तांनो जाणुनी घ्या रे ।
समर्थ कार्य थोर सारे । भक्त- कल्याणाचे ।। ७ ।।
काव्य-वंदना लेखनात । स्वामी चरित्र यावे शब्दात ।
हीच ईच्छा असे मनात । कवी अरुणदासाच्या ।। ८ ।।
___________________________
क्रमशः हे लेखन.. करी कवी अरुणदास-
अरुण वि. देशपांडे- पुणे.
___________________________