You are currently viewing नातं

नातं

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…महाराष्ट्र रणरागिणी साहित्य कुंज समूहाच्या सदस्या लेखिका कवयित्री किरण करामोरे चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना

विषय-“वडाचा नाही* *विचारांचा धागा हो तू

शीर्षक :-नातं

*वडाचा नाही विचारांचा धागा हो तू **
*गुंफुनी धाग्यात नाती एक माळेत बांध तू*

*बहीण भावांचे ऋणानुबंध नाळ रक्ताची*
*राखीच्या धाग्याचे बंध सदा पाळ तू*

*सासू सासऱ्यांची सेवा कर उपकार आभाळभर*
*वाळीत टाकून,वृद्धाश्रमाचे द्वार नको उघडू तू*

**मैत्री नाते जन्माने ना, निवडले ते कर्माने*
*एक चुकीचा धागा ताणून नातं तोडू नकोस तू*

*समान हक्क स्त्री पुरुषाला जरी मिळाला*
*संसाराच्या धाग्याला सदा विणत राहा तू*

*होऊ नये अपघात म्हणुनी ब्रेक वाहनाला*
*संसार रथाची कमान बनुनी ढाल व्हावे तू*

*तारुण्य ढळणारे,म्हातारपण न कुणा चुकले*
*आज जसे वागशील उद्या अनुभवशील तू*

*गाडी,बंगला ,अपार,धन दौलत जरी तुजपाशी*
*वात्सल्याच्या धाग्याला तडपत राहशील तू*

*कच्चे धागे संघटित कुटुंब ,गाठीने जोडावे*
*विभक्त कुटुंबात,संकट वेळी सडे पडशील तू*

*थोर मोठ्यांचा जर अपमान करशील*
*लेकरे काय संस्कार घेतील, विचार कर तू*

*बदलत्या काळाची गरज,नात्यांना टिकविणे*
*वृद्धावस्थेत कधी एकटे ना राहावे तू!*

*कधी एकटे ना राहावे तू !*

*किरण महादेव चौधरी*
*नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 5 =