भरतनाट्यम नृत्य संगीत परीक्षेत कु.जान्हवी तुकाराम ठाकूर हिने मिळवला सिंधुदुर्गातून प्रथम विशारद होण्याचा आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान ‼️‼️‼️..
कुडाळ
सत्र नोव्हेंबर/डिसेंबर 2024 या सत्रातून कुडाळ साईदरबार केंद्रातून झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मिरज/मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत कुडाळ,नेरूर गावची सुकन्या कु.जान्हवी तुकाराम ठाकूर हिने भरतनाट्यम या नृत्य विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळावीला आहे, तिच्या आईवडिलांना या यशाबद्दल विचारले असता म्हणालें की, तिला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड होती वयाच्या सहाव्या वर्षी सायकल चा टायर कमरेभोवती फिरवून रिंगा नृत्य करतानाची नजाकत पाहून आमचा निर्णय पक्का झाला कीं तिला आता आपण शास्त्रीय नृत्य क्लासला शिक्षणाला पाठवले पाहिजे आणि हाच खरा तिचा आयुष्यातला घेतलेला निर्णय आज आम्हाला या पदवीने मनाला समाधान करून जाणारा निर्णय वाटतो, वयाच्या नवव्या वर्षी तिला सिद्धाई कला अकॅडमी संचालिका गुरुवर्या सौ. कविता राऊळ-शेट्ये मॅडम यांच्याकडून तिने त्यांच्या पहिल्या प्रथम शिष्या म्हणून सुरुवात केली,प्राथमिक ते विशारद पूर्ण पर्यंतचे शास्त्रीय प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने घेतले तिच्या या यशामध्ये महत्वाचा वाटा आपल्या गुरुवर्या सौ.कविता राऊळ मॅडम यांचा आहे असे जान्हवी ने सांगितले आहे,यानंतर तिने अनेक स्पर्धा मध्येच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नामांकने पटकावली आहेत, त्याचबरोबर श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे पखवाज अलंकार प्रशिक्षक श्री महेश सावंत यांच्या साथीने अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग, कर्नाटक मध्ये 101 पखवाजवादक आणि भरतनाट्यम असे अनेक कार्यक्रम मध्ये सदाबहार नृत्य तिचे प्रसंशनीय ठरले आहे,तसेच तिच्या यश हार्मोनियमवादक व गायक श्री अमितजी उमळकर(कुडाळ) यांचीही मोलाची साथ लाभली आहे,तसेच जगन्नाथ संगीत विद्यालय श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थीनी आणि जान्हवी यांची बहीण कु.समृद्धी ठाकूर हिने महत्वपूर्ण आणि मोलाची पखवाज साथ भरतनाट्यम अंगाने करत तिला यशस्वी साथ दिली आहे, संपूर्ण सिंधुदुर्गमधून प्रथम आणि भरतनाट्यम नृत्य परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत सिंधुदुर्ग कलाक्षेत्रात मनाचा तुरा तिने रोवला आहे जान्हवी च्या या यशाबद्दल सिद्धाई डान्स कला अकॅडमी च्या संचालिका गुरुवर्या सौ.कविता राऊळ यांनी तिचे विशेष कौतुक केलें आहे तसेच सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.