You are currently viewing ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे २ व ३ एप्रिल ला मोफत आयोजन

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे २ व ३ एप्रिल ला मोफत आयोजन

कणकवली :

 

राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल मंगळवार व दिनांक ३ एप्रिल बुधवार रोजी दुपारी ठीक १२ वाजता हा मोफत चित्रपट दाखविला जाणार आहे.

लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली आणि स्टार लाईट चित्रपटगृह, देवगड येथे हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा