तारकर्ली स्वामी समर्थ मठ येथे २ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ पालखी पादुका दर्शन सोहळा
२० व्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त २ व ३ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
मालवण
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे मालवण तालुक्यातील तारकर्ली गावात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आगमन होणार आहे. श्री स्वामी समर्थ मठ तारकर्ली २० व्या वर्धापन दिन निमित्ताने पालखी पादुका दर्शन सोहळा व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २ व ३ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्रीमूर्तीवर अभिषेक त्यानंतर सकाळी ८:३० वाजता श्री दत्त मंदिर वायरी बांध येथून पालखीचे भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा व दुपारी १२ वाजता महाआरती झाल्यानंतर १२:३० वाजता महाप्रसाद होणार आहे.
सायंकाळी ४ वाजता सखी फुगडी संघ पावशी यांचा फुगडी कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रीमूर्ती ची पूजा सायंकाळी ७ वाजता महाआरती व रात्रौ ८ वाजता ह. भ. पं. गोविंद आसोलकर बुवा बाव कुडाळ यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता मान्यवरांचे सत्कार समारंभ झाल्यानंतर रात्रौ ठीक १० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप नेरुर कुडाळ यांचा नेरूरच्या पारंपारिक लोककलेचा मांड उत्सव संपन्न होणार आहे.
सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता श्रीमूर्तीवर अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती व सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रुक्माई भजन मंडळ खैदा कातवड यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती झाल्यानंतर रात्रौ ८ वाजता श्री महापुरुष महिला भजन मंडळ तारकर्ली वरची वाडी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. रात्रौ ठीक १० वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा श्री स्वामी समर्थ चरित्रावर आधारित ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरी सर्व स्वामी भक्तांनी पालखी पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राजेंद्र तारी, ज्योतिष भास्कराचार्य, अशोक मयेकर, अँड. रुपेश परुळेकर व स्वामी समर्थ मठ तारकर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.