You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी

खासदार नारायण राणे ,नामदार नितेशराणे साहेब यांचा भव्य नागरी सत्कार-अध्यक्ष प्रसाद पारकर

देवगड

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३७ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत वैभववाडी येथे संपन्न होत आहे. या मेळाव्याचे आयोजन वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या व्यापारी एकता मेळाव्याचे औचित्य साधून खासदार नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय नामदार नितेश राणे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री,महाराष्ट्र राज्य यांचा जिल्ह्यातील तमाम व्यापारी वर्गाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. तसेच खास.नारायण राणें व्यापाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
मार्गदर्शक व्याख्याते म्हणून प्रसाद कुलकर्णी यांचे,यशाचे गुपित काय!, अतिश कुलकर्णी व विनोद मिस्त्री यांचे, हमखास यशाची योजना व श्रीकांत पाटील यांचे स्टार्ट अप इंडिया अशा विषयांवर मार्गदर्शन करतील

महासंघाचे मानाचे पुरस्कार पुढील प्रमाणे प्रदान करण्यात येतील

*जीवन गौरव पुरस्कार सन्मानित, ज्येष्ठ व्यापारी माननीय टी.एस. तथा घोणे मामा
*कै.भाई भोगले स्मृति पहिल्या पिढीचा युवा व्यापारी गौरव, श्री नयन मोरे
*कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला व्यापारी गौरव पुरस्कार, श्रीमती सरोजिनी भोवड आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्कार, श्री श्रीराम शिरसाट कुडाळ*कै.बापू नाईक स्मृती, जिल्हास्तरीय विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार, माचली रिसॉर्टचे संस्थापक श्री भैय्या सामंत

*कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार,नांदगाव व्यापारी संघटना, नांदगाव
*तसेच कै.उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मेळाव्याच्या दिवशी प्रदान करण्यात येईल.

व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे ३१जानेवारी २०२५ रोजी सर्व दुकाने, आस्थापने बंद राहतील, याची कृपया नोंद घ्यावी. ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा