You are currently viewing ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपची बाजी…

ग्रा.पं. पोटनिवडणुकीत भाजपची बाजी…

ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत हळवलचे सुदर्शन राणे तर लोरे मधून काशीराम नवले विजयी…

कणकवली

कणकवली तालुक्यातील लोरे नं 1, हळवल ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहे. हळवल ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीत सुदर्शन राणे यांनी नामदेव राणे यांचा पराभव केला. सुदर्शन राणे यांना 230 मते, नामदेव राणे 187 मते मिळाली. नोटा तीन मतदारांनी नोटाचा वापर केला. लोरे ग्रा.पं.च्या प्रभाग क्रमांक 3 च्या पोटनिवडणुकीत काशीराम नवले यांनी संदीप नराम यांचा पराभव केला. काशिराम नवले यांना 222 मते तर केशव नराम यांना 110 मते मिळाली. 3 मतदारांनी नोटाचा वापर केला.

लोरे नं 1, हळवल ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. यावेळी तालुका निवडणूक अधिकारी आर जे पवार, निवडणूक निर्णय अधिकारी हळवल विलास निकुम,लोरे रवी मेस्त्री, मतमोजणी सहाय्यक अधिकारी हळवल गणेश गोडे,लोरे श्री.सातारकर,नायब तहसीलदार श्री.राठोड उपस्थित होते. मतमोजणीच्यावेळी तहसील कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विजयी उमेदवारांनी आम नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आम. राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा