बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे बी. एफ्. ए. फाइन आर्ट ,अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम ) आणि सीईटी ( प्रवेश परीक्षा) या संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा ०१ फेब्रुवारी रोजी
सावंतवाडी
बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन *शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५* रोजी करण्यात आले आहे. पारंपरिक चित्रकला शिक्षणापेक्षा वेगळा असा *अप्लाईड आर्ट (उपयोजित कला)* हा कला शिक्षणाचा आधुनिक दृष्टिकोन आहे.कलेकडे केवळ आवड आणि छंद म्हणून न पाहता त्याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर वेगवेगळ्या प्रकारे कसा करावा तसेच कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती विविध क्षेत्रात अधिक प्रमाणात परिणामकारक कसे ठरू शकते या विषयाचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापक करणार आहेत. त्यामध्ये बी.एफ. ए उपयोजित व ललित कला अभ्यासक्रम सीईटी प्रवेश परीक्षा व या क्षेत्रातील करिअर संधी तसेच *जाहिरात एजन्सी, ॲनिमेशन, पब्लिशिंग स्टुडिओ, गेमिंग स्टुडिओ ,VFX, UI-UX डिझाईन ( ॲप डिझाईन), चित्रपट निर्मिती, ई लर्निंग कंपन्या ,लेआउट डिझाईन, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कन्सेप्ट आर्टिस्ट, टायपोग्राफी, कॅरेक्टर डिझाईन, AI टेक्नॉलॉजी* आणि अशा अनेक संधी या अभ्यासक्रमामुळे निर्माण झाल्या आहेत तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरास उपस्थित रहावे असे आवाहन बी.एस. बांदेकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. उदय वेले सर यांनी केले आहे. *कार्यशाळा -शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *ठिकाण बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी 54/1 वनभवन जवळ सालईवाडा सावंतवाडी * संपर्क -०२३६३२७५३६१ मोरजकर सर ९४०५८३०२८८, नेरुरकर सर ९४२०२६०९०३.*