You are currently viewing मालवण शहरात मान्सूनपूर्व नाले-गटार सफाई व स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज..

मालवण शहरात मान्सूनपूर्व नाले-गटार सफाई व स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज..

मालवण

मालवण नगर परिषद तर्फे शहरातील नाले/गटारे/व्हाळ्या यांची पावसाळ्यापुर्वी साफसफाई/ स्वच्छता करण्यासाठी प्रशासकीय ठराव क्र. 128 दि. 20/02/2023 अन्वये मान्यता घेवून जा.क्र.मानपा. 349/2023 दि. 03/03/2023अन्वये रस्ते गटर वार्षिक ठेक्या अंतर्गत जाहिर ई-निविदा प्रसिध्दी करण्यात आलेली होती. तथापी या ई-निविदा मागणीला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे इकडील जा.क्र. 411/ 2023 दि. 13/03/2023 नुसार दुसरी ई-निविदा मागणी प्रसिध्द करणेत आलेली होती. दुसऱ्या ई-निविदा मागणीलाही कंत्राटदारांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा जा.क्र. 432/2023 दि. 20/03/2023 नुसार तिसऱ्यांदा ई-निविदा मागणी करणेत आलेली असुन तिसऱ्या ई-निविदा मागणी सुचनेनंतर दि.27/03/ 2023 रोजी एकत्र ई-निविदा प्राप्त झालेली आहे. दि. 31/03/2023 रोजी तांत्रिक लखोटा उघडण्यात आला असता कागदपत्र अपूर्ण असल्याने 05/04/ 2023 रोजी कागदपत्र पूर्तता करण्यास कंत्राटदार यांस कळविले असता कंत्राटदार यांनी दि. 10/04/2023 रोजी कागदपत्र पूर्तता केली. त्यानुसार वित्तीय लखोटा 15/04/2023 उघडण्यात आला.
मालवण नगरपरिषद तर्फे शहरातील नाले/गटारे/व्हाळ्या यांची पावसाळ्यापुर्वी साफसफाई/ स्वच्छता करणे कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडील चालू राज्य दर सूची (SSR २०२२ -२३ ) नुसार करून त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांजकडील तांत्रिक मान्यता घेण्यात आलेली आहे तथापि प्राप्त एक निविदा अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा 9.95% जादा दराने असल्याने हे ई-निविदा दर नगरपरिषदेवर अतिरिक्त आर्थीक बोजा टाकणारे असल्याने संबंधित निविदाधारक सोबत दर वाटाघाटी केल्यानुसार कंत्राटदार यांनी दि.20/04/2023 रोजीच्या पत्रान्वये जादा ई-निविदा दर कमी करुन अंदाजपत्रक दरात काम करण्याचे मान्य केल्यामुळे इकडील जा.क्र.प्रशासकीय ठराव क्र.142/2023 दि. 20/04/2023 अन्वये सदरची अंदाजपत्रकीय दराची ई-निविदा मंजुर करणेत आलेली आहे. त्यानुसार कंत्राटदार श्री. मनोज मधुकर वायंगणकर रा. सुकळवाड ता. मालवण यांना जा.क्र.मानप.665/2023 दि.21/04/2023 नुसार कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे.
शहरातील सर्व नागरीक/ व्यावसाईक/ व्यापारी/ दुकानदार यांना विनंती करणेत येते की, त्यांनी नगरपरिषद कंत्राटदार यांचेमार्फत सुरु करण्यात आलेल्या नाले/गटारे स्व्च्छता कामी आपल्या कोणत्याही साहित्याचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेवून शहरवासीयांच्याआरोग्याचे व सार्वजनिक हिताचे काम योग्यरित्या पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. या कामाबाबत कोणतीही हरकत अथवा सुचना असल्यास तात्काळ या कामावरील नगरपरिषद च्या सुपरवायजरच्या निदर्शनास आणावी किंवा लेखी स्वरुपात नगरपरिषद कडे दाखल करावी. काम पुर्ण झाल्यानंतर मागावून प्राप्त होणाऱ्या तोंडी तक्रारीची दखल घेता येणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
कोणत्याही परिस्थितीत या कामात कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेवून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले/ गटारे स्वच्छतेची सार्वजनिक हिताची कामे योग्यरित्या करण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे आणि एकदा नाले / गटारे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये कोणताही कचरा / डेब्रीज टाकू नये असे आवाहन नगरपरिषद तर्फे करण्यात येत आहे. स्वच्छ केलेल्या नाले / गटारे यामध्ये कोणीही कचरा / डेब्रीज टाकतांना दिसुन आल्यास त्याला अटकाव करुन याबाबतची माहिती / फोटो नगरपरिषदकडे द्यावी;जेणेकरुन अशा उपद्रवी प्रवृत्ती विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम 2017 नुसार ,योग्य ती कायदेशीर कारवाई करणे नगरपरिषदेला शक्य होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा