आंबेगाव येथे PRI CBO अभिसरण प्रकल्पाअंतर्गत उमेद अभियान चा श्री देव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायत च्या वतीने ‘म्हारकटेवाडी बालसभे’ची स्थापना
आंबेगाव येथे उमेद अभियानांतर्गत कार्यरत असणारा श्रीदेव क्षेत्रपाल ग्रामसंघ व आंबेगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने PRI CBO अभिसरण प्रकल्पाअंतर्गत म्हारकटेवाडी येथे वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील मुलांची बालसभा स्थापन करण्यात आली.
मुलांना असणाऱ्या समस्या, आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, मार्गदर्शन याविषयीच्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावर मांडण्यासाठी मुलांना हक्काचे व्यासपीठ बालसभेच्या निमित्ताने मिळणार आहे. तसेच मुलांना ग्रामपंचायत,स्वयंसहायता समूह यांची रचना प्रात्यक्षिकासह समजून घेता येणार आहे.
‘म्हारकटेवाडी बालसभे’ची अध्यक्ष म्हणून कु.श्रेया संदीप राऊळ, उपाध्यक्ष कु. प्रणय परेश तेली, सचिव कु. विद्या देऊ जंगले, सहसचिव कु. नाना पुनाजी बरागडे, कोषाध्यक्ष कु. प्रतीक्षा प्रशांत पंदारे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला आंबेगाव ग्रामपंचायत चे सरपंच श्री संजू परब, PRI CBO Convergence उपक्रमासाठी केरळ येथील ‘कुडुंब श्री’ च्या श्रीम. गिरिजा संतोष यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर DRP श्रावणी वेटे, BRP प्राची राऊळ, ग्रामसंघाच्या पदाधिकारी श्रीम.रेखा गावडे प्रभाग समन्वयक श्री अभय भिडे उपस्थित होत्या तसेच उमेद च्या महिला उपस्थित होत्या.
हा उपक्रम सुरू करण्यासाठी आंबेगाव च्या LRP व CRP म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीम.साक्षी संदीप राऊळ यांनी विशेष प्रयत्न केले.