You are currently viewing ऑन कॉल रक्तदाते संस्था. सिंधुदुर्ग(रजि.) तर्फे “रक्तदाता सन्मान सोहळा” उद्या सावंतवाडीत

ऑन कॉल रक्तदाते संस्था. सिंधुदुर्ग(रजि.) तर्फे “रक्तदाता सन्मान सोहळा” उद्या सावंतवाडीत

*ऑन कॉल रक्तदाते संस्था. सिंधुदुर्ग(रजि.) तर्फे “रक्तदाता सन्मान सोहळा” उद्या सावंतवाडीत*

सावंतवाडी:

“रक्तदान हेच श्रेष्ठदान” असं म्हटलं जातं परंतु रक्तदान करणाऱ्या व्यक्तींकडे रक्तदाता म्हणून पाहिजे तेवढं गांभीर्याने पाहिले जात नाही. रक्तदान केल्यानंतर त्या व्यक्तीने काही खाल्लं का..?ती व्यक्ती घरी पोचली का..? याकडे मात्र सर्वांचा दुर्लक्ष होतो. याला छेद देऊन रक्तदात्यांच्या कार्याला बळ देऊन त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याचे कार्य ऑन कॉल रक्तदाता संस्था, सिंधुदुर्ग (रजि.) यांनी हाती घेतले असून २०२४ मध्ये ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या ऑन कॉल रक्तदात्यांचा सन्मान सोहळा उद्या दि.२६ जानेवारी २०२५ रोजी रवींद्र मंगल कार्यालय, सावंतवाडी येथे स.१०.०० ते दु. २.०० या वेळेत आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.दयानंद गवस (निवृत्त पोलिस उप अधीक्षक) हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुदेशजी नार्वेकर (संयोजक, सार्थक फाउंडेशन, गोवा), श्री.लखमराजे भोसले (युवराज, सावंतवाडी संस्थान) हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा पाहुण्यांचे स्वागत, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत, रक्तदात्यांचा सन्मान, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन अशी असणार आहे. तरी संस्थेचे सभासद, सत्कारमूर्ती, नियमित रक्तदाते, सन्माननीय देणगीदार आणि हितचिंतक यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांच्या कार्याच्या गौरव समारंभास शोभा आणावी असे आवाहन अध्यक्ष श्री.दयानंद गवस, सचिव बाबली गवंडे, उपाध्यक्षा मीनल सावंत, कार्याध्यक्ष महेश रेमुळकर आदी संस्था पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा