You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा…

पालकमंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा…

सिंधुदुर्गनगरी  

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे  सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

       सोमवार दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 09.30 वा. खारेपाटण-कासर्डे ता. कणकवली येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.00 वा. आंब्रड ता. कुडाळ (दिंडाळेवाडी) येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.45 वा. वेताळ -बांबार्डे ता. कुडाळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.15 वा. पावशी-शिलटेवाडी ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.45 वा. पिंगुळी ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 01.30 वा. माणगाव ता. कुडाळ येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 02.30 वा. पाहणी स्थळावरुन मोटारीने सिंधुदुर्गनगरी ओरोसकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). दुपारी 04.00 वा. हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020-21 करीता बदल करण्यात आलेल्या निकाषांबाबत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत चर्चा  (स्थळ- नविन डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग). सायं. 04.15 वा. पत्रकार परिषद. (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस सिंधुदुर्ग).  सायं. 05.30 वा. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून मोटारीने पाली ता. जि. रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =