You are currently viewing राऊत विद्यालय रेडीच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

राऊत विद्यालय रेडीच्या विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मिळवलेलं यश हे नक्कीच स्फूर्तिदायक असतं आणि इतर मुलांसाठी देखील प्रेरणादायी ठरतं. शहरातील मुले विविध शिकवण्या घेऊन यश संपादित करतात परंतु ग्रामीण भागातील मुलांना मात्र यशासाठी झगडावे लागते, आणि त्यातून जेव्हा यशाला गवसणी घालतात तेव्हा नक्कीच ते त्यांच्यासाठी आनंददायी असतंच परंतु त्यांना पाहणाऱ्या इतर मुलांसाठी आदर्शवत ठरतं. अशावेळी यशाला गवसणी घालणाऱ्या मुलांचे कौतुक करणे ही देखील आपली जबाबदारी असतेच.
रेडी सारख्या ग्रामीण भागातील मातोश्री पार्वती राऊत इंग्रजी माध्यमाच्या दोन विद्यार्थिनीनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केलं आहे, त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आठवी इयत्तेतील गार्गी व्यंकटेश डुबळे (५९.७३) ही तालुक्यातून २७ वी आली तर स्फूर्ती श्रीपाद तिवरेकर (४९.६६) टक्के गुण प्राप्त करत शिष्यवृत्ती धारक ठरली. दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शाळेचे अध्यक्ष, मुख्य सल्लागार, सदस्य व पालक वर्गाने कौतुक व अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 8 =