You are currently viewing मुणगे भगवती देवालयात रंगली संगीत मैफिल!

मुणगे भगवती देवालयात रंगली संगीत मैफिल!

मुणगे भगवती देवालयात रंगली संगीत मैफिल!

विध्यार्थ्यानी केले भाविकांना मंत्रमुग्ध

मालवण

सुर, ताल यांचा सांगम झाला कि चांगल्या संगीताची निर्मिती होते. आणि या संगीत निर्मितीसाठी बाल गायकांची साथ लाभली तर कार्यक्रम आणखी बहारदार होतोच होतो. मुणगे येथील श्री भगवती देवालयात अशीच एक अनोखी संगीत मैफिल श्री भगवती हायस्कुलच्या बाल गायकांची संपन्न झाली! निमित्त होते ते ग्रामदेवता श्री भगवती देवी वार्षिक जत्रोत्सवाचे. उत्तरोतर रंगत गेलेल्या या मैफिलीला उपस्थित प्रेक्षकांनी सुद्धा बक्षीस रुपी कौतुकाची थाप या विध्यार्थ्यांना दिल्याने बाल गायक आनंदुन गेले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ
अनुराधा कदम हिने बा विठ्ठला धाव पाव रे या भक्तीगीताने केला. यानंतर लीशा तेली हिने गार डोंगराची हवा,
शमिका जाधव हिने चंद्र भागेच्या तिरी, सानवी दळवी हिने ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर हे भक्तीगीत गायले.
संस्कृती सारंग हिने तुम उठो सिया, साक्षी मूणगेकर – रात्रदिवसा देवा तुमची हे दत्तगीत,
चैतन्य रूपे – भरला तुझा दरबार,
जय सावंत – जगतजननी तू अंबा माता, अनंन्या गावकर – मी शरण तूला अंबे माँ,
सोहम हिर्लेकर – भक्ती वाचूनी मुक्तीची,
आराध्या कदम – विठू माऊली तू, सिद्धेश म्हापणकर – तूच सूर ठावा मूजसी, पल्लवी मूणगेकर – रखुमाई रखु‌माई, मनस्वी आचरेकर दर्शन देरे देरे भगवंता, सिद्धेश म्हापणकर-
तुझ्या कृपेने दिन उगवेहा, पार्थ गावडे याने विश्वाचा विश्राम रे,
मृगाक्षी हिर्लेकर हिने सुंदर ते ध्यान हे भक्ती गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात
भूमी आईर हिने केशवा माधवा, विनोद मुणगेकर- टाळ बोले चिपळीला, दक्षेश मांजरेकर याने निघालो घेऊन दत्ताची पालखी,
आयुश सावंत याने अवघे गरजे पंढरपूर तर कार्यक्रमाची सांगता
लावण्या पटकारे हिने गायलेल्या पंढरी पंढरी विठू रायाची नगरी या अभंगाने झाली. मुणगे गावचे सुपुत्र संगीत रत्न राजेंद्र प्रभू यांनी हार्मोनियम तर शैलेश सावंत यांनी तबला साथ केली. निवेदन व मार्गदर्शन कला शिक्षिका सौ गौरी तवटे, शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले. श्री भगवती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विध्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा