You are currently viewing दे दान त्या क्षणांच्या

दे दान त्या क्षणांच्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दे दान त्या क्षणांच्या*

 

मौनातल्या गुलाबी शब्दास ऐकतो मी

दे दान त्या क्षणांच्या हक्कास मागतो मी।।१।।

 

भाळावरी प्रसन्न चिन्हांस मोजतो मी

ओठात साठलेल्या ओढीस जाणतो मी ।।२।।

 

पायात बांधलेले नूपुर वाजतांना

सारंग नर्तनाच्या नादात राहतो मी ।।३।।

 

हातात घातलेल्या स्वर्णीम कंकणांचे

येतात सूर सारे माझेच मानतो मी ।।४।।

 

चित्तातल्या तुझ्या गं भावास तोड नाही

नेत्रात रंगलेल्या चित्रास पाहतो मी।।५।।

 

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख

नाशिक ९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा