You are currently viewing २३ जानेवारीला महिलांसाठी नि:शुल्क व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

२३ जानेवारीला महिलांसाठी नि:शुल्क व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

*२३ जानेवारीला महिलांसाठी नि:शुल्क व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा*

पिंपरी

राष्ट्रीय बालिकादिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी आणि ब्रह्माकुमारी शिवशक्ती लीडरशिप ॲप्रोच (एस एस एल ए) इंडिया रिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीईंग दी बेस्ट व्हर्जन ऑफ यू’ या महिलांसाठी नि:शुल्क व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी कम्युनिटी सेंटर, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० या कालावधीत ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. भारत आणि नेपाळ स्तरावरील राजयोग मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी डॉ. सुनीतादीदी आणि विभागप्रमुख ब्रह्माकुमारी प्रवीणादीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी महिलांना मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. वय वर्षे अठरा आणि त्या पुढील महिलांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९२८४०४६२१९ वर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष शालिनी चोप्रा यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा