सावंतवाडी :
श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा, सावंतवाडी येथे रविवार दि. १९ जानेवारी २०२५ रोजी श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, जिल्हा कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत सत्संग कार्यक्रम संपन्न होणार आहे, यावेळी सकाळी ५.३० पासून रात्री ८.०० वाजेपर्यंत विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी गुरुबंधू भगिनी आणि भाविकांनी सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, सावंतवाडी कार्यकारिणीने केली आहे.
यानिमित्त सकाळी ५.३० वा. काकड आरती, ९.०० वा. सकाळचे सांप्रदायिक भजन, स.११.००वा.दुपारचे सांप्रदायिक भजन, सायं.५.०० वा. दिंडीच्या गजरात श्री.स्वामीजींचे आगमन, पाद्यपूजा, ६.०० वा. रात्रीचे सांप्रदायिक भजन, ७.००वा. दासबोध वाचन, ८.०० वा. श्री.स्वामीजींच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचन, आरती, दर्शन व महाप्रसाद असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळ: श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा, सावंतवाडी (आत्मेश्वर मंदिर नजीक), सिंधुदुर्ग. संपर्क क्र.९४२२८७१७७८ / ९४२०४०८८५३