You are currently viewing नांदगाव- देवगड मार्गावरील कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात

नांदगाव- देवगड मार्गावरील कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात

पोलीस – एसटी कर्मचारी घटनास्थळी दाखल

कणकवली

देवगड- निपाणी मार्गावर कोळोशी येथे एसटी- डंपर यांच्यात भीषण अपघात घडला असून या अपघातात डंपर चालक केबिन मध्ये अडकला आहे. डंपर चालकाच्या सुटकेसाठी पोलीस कर्मचारी, एसटी कर्मचारी, तसेच ग्रामस्थ यांचे शर्थीचे प्रयन्त सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी कि बसचालक महेश रघुनाथ अतिग्रे हे पुणे- देवगड (एम. एच २० बीएल ४०७९) हि बस घेऊन देवगड कडे जात होते. यावेळी सदर एसटीची कणकवलीकडे येणाऱ्या डंपरला (एम. एच ०७ सी ६२३७) समोरून धडक बसली. हि धडक एवढी जोरदार होती कि डंपरचे केबिन मोडून डंपर चालक केबिन मध्ये अडकून पडला. तर एसटी च्या मागाहून येणारा छोटा टेम्पोची एसटीला मागाहून धडक बसली.

घटनास्थळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, एसटी विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ, विभागीय वाहतुक अधिकारी मोहनदास खराडे तसेच पोलीस कर्मचारी, एसटी कर्मचारी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. एसटीतील प्रवाशांना शिरगाव आणि कणकवली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 4 =