सचिन सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

सचिन सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

कणकवली

कणकवली तालुक्यातील तोंडवळी बावशी गावचे सुपुत्र सचिन सावंत यांचे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले होते, आमदार नितेश राणे  यांच्या सहकार्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून कृत्रिम पाय बसविण्यात आले. त्यांच्या परिवाराने आमदार नितेश राणे यांची कणकवली निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले. सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, जिल्हा परिषद सदस्य बांधकाम सभापती बाळा जठार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, कणकवली मंडळ अध्यक्ष पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, कणकवली खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष प्रकाश सावंत, भाजप कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप सावंत, बबलू सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा