चिपी विमानतळ उद्घाटनाची तारीख अजून निश्चित नाही; परंतु येत्या आठ दिवसांत उडेल विमान

चिपी विमानतळ उद्घाटनाची तारीख अजून निश्चित नाही; परंतु येत्या आठ दिवसांत उडेल विमान

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

चिपी विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असून, अजूनही तारीख निश्चित झाली नाही आहे. येत्या आठ दिवसांत यावरून विमान उडेल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली आहे. चिपी विमानतळावरून विमान उडण्याच्या अनेक तारख्या व्ह्यारल होत असल्या तरी याबाबत अजुन तरी तारीख निश्चित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या विमानतळाच्या उद्घाटनासाठी पोलिस यंत्रणा, सुरक्षा नियोजन पूर्ण झाले असून, फिरत असलेली पत्रिका ही अनधिकृत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. या कामासाठी केंद्राकडून कोणत्याही प्रकारची आडकाठी केली जात नसल्याचे पण त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा