You are currently viewing सावंतवाडी येथे 4 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा

सावंतवाडी येथे 4 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, सिंधुदुर्ग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आयटीआय प्रशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे ॲपरेन्टीसशिप रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली ॲपरेन्टीसशिपची रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच नोकरीच्या शोधातील उमेदवारांनीही याच पोर्टलवर स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित ॲपरेन्टीसशिप पदासाठी ऑनलाईन अर्ज  करावे असे आवाहन शा.गि.पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा