You are currently viewing सावंतवाडी हॉस्पिटल अपघात विभाग समोरील खराब रस्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून दुरुस्ती.

सावंतवाडी हॉस्पिटल अपघात विभाग समोरील खराब रस्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून दुरुस्ती.

सावंतवाडी हॉस्पिटल अपघात विभाग समोरील खराब रस्ता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून दुरुस्ती.

अपघात विभाग परिसरातील रस्ता नवीन करण्यासाठी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर चौगुले व बांधकाम विभागाला निवेदन देणार करणार- रवी जाधव

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव व रुपा मुद्राळे तसेच सावंतवाडी शहरामध्ये बांधकाम व्यवसायिक व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे दादा उर्फ शिवप्पा नग्नूर यांच्या पुढाकारातून अपघात विभाग समोरील खडबडीत व खराब झालेला रस्ता दुरुस्ती करण्यात आला.
स्ट्रेचरद्वारे खडबडीत रस्त्यावरून अपघातग्रस्त रुग्ण हॉस्पिटलच्या आत घेताना रुग्णाला मोठ्या प्रमाणात हादरे बसायचे ही बाब हॉस्पिटलच्या ठिकाणी सतत कार्यरत असणारे सामाजिक बांधिलकींचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांच्या लक्षात येताच त्यांनी
सदर रस्ता दुरुस्ती करण्याचं ठरवलं तेव्हाच योगायोगाने हॉस्पिटलमध्येच दादा कॉन्ट्रॅक्टर यांची भेट झाली.
दादा यांचा नातेवाईक सदर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता व त्यांना या प्रसंगातून जावं लागलं.अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये या कारणास्तव त्यांनी या सेवाभावी कार्यासाठी पुढाकार घेऊन सदर रस्ता दुरुस्ती करून दिला. रुग्णांना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला खूप मोठे सहकार्य केल्याबद्दल कॉन्टॅक्टर दादा व त्यांच्या कामगारांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा