You are currently viewing अक्षर प्रदर्शन कला रसिकांना कायमस्वरूपी पाहायला मिळावे – चित्रकार राजू शिंगे

अक्षर प्रदर्शन कला रसिकांना कायमस्वरूपी पाहायला मिळावे – चित्रकार राजू शिंगे

तळेरेतील निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट

तळेरे :

संदेश पत्र संग्रह जोपासण्यामागे आपली नाविन्यपूर्ण  कल्पना आहे. विशेष म्हणजे या संग्रहाचे अत्यंत कष्टपूर्वक केलेले जतन वाखाणण्याजोगे आहे. या संग्रहाचे कायमस्वरुपी जागेत अक्षर प्रदर्शन सर्व कला रसिकांना भविष्यात पहायला मिळायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द चित्रकार राज शिंगे यांनी केले. ते तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट दिली त्यावेळी बोलत होते.

मुंबई येथील सुप्रसिध्द चित्रकार राज शिंगे यांनी नुकतीच तळेरे येथील अक्षर घराला भेट दिली. राज शिंगे आणि माणिक शिंगे हे पती पत्नी चित्रकार आहेत. त्यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने होतात. त्यांचे महात्मा गांधी हे मांडणी शिल्प 2005 च्या जागतिक ‘बीएनाले’मध्ये मांडण्यासाठी भारतातून निवडण्यात आले होते. ते शिल्प चीनच्या संग्रही आहे.

संदेश पत्र हा संग्रह पाहताना शिंगे यांनी विविध कलावंत मित्रांच्या आठवणी जागवल्या. त्यावेळी या संग्रहाचे कौतुक करत विविध सुचनाही केल्या. ते म्हणाले की, आपण जतन केलेला हा खजिना अनमोल आहे. अत्यंत दुर्मीळ असा हा ठेवा जपा. भविष्यात त्याला निश्चीत मोल प्राप्त होईल. असे सांगतानाच पोस्टकार्डच्या कल्पनेचे विशेष कौतुक केले.

पोस्टकार्डवर घेतलेल्या संदेश पत्राच्या नाविन्यतेचे त्यांनी भरभरुन कौतुक करुन या संग्रहाच्या भविष्यातील संकल्पने विषयी जाणुन घेतले. हा व्यासंग खूपच चांगला असल्याचे त्यावेळी राज शिंगे म्हणाले.

 

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात (चौकट)

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना चित्रकार राज शिंगे यांनी शुभेच्छा दिल्या
संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांना चित्रकार राज शिंगे यांनी शुभेच्छा दिल्या

 

निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे.

 

भारतीय पोस्टकार्डचे कौतुक (चौकट)

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला चित्रकार राज शिंगे यांनी सदिच्छा भेट दिली

 

भारतीय पोस्टकार्डवर देशातील तसेच परदेशातील नामवंत व्यक्तिंचे संदेश पाहून त्याचेही चित्रकार राज शिंगे यांनी कौतुक केले. 1500 व्यक्तींचे संदेश या पोस्ट कार्डवर असल्याने भारतीय पोस्ट कार्ड केवळ देशापुरतेच मर्यादीत न राहता थेट हॉंगकॉंग, बांगलादेश, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे जाऊन पोहोचले असून हा भारतीय पोस्ट विभागाचा मोठा गौरव असल्याचे उदगार काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा