You are currently viewing वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तर्फे सांगेली व आंबोली सबस्टेशन अंतर्गत वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन

वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तर्फे सांगेली व आंबोली सबस्टेशन अंतर्गत वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन

*महावितरणचे सहाय्यक अभियंता राहणार उपस्थित*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन महावितरण कंपनी कडून त्यांचे निवारण करण्यासाठी वीज ग्राहक संघटना कार्यरत असून रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील सांगेली व आंबोली सब स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीज संबंधित समस्या निवारण्यासाठी श्री.साटम महाराज मठ, दाणोली येथील सभागृहात दुपारी ३.०० वाजता वीज ग्राहकांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

सदर बैठकीत दोन्ही उपकेंद्राच्या अंतर्गत ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण केले जाणार आहेत. या बैठकीसाठी वीज ग्राहक संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी, महावितरणच्या दोन्ही उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता श्री.चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सांगेली व आंबोली वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील ग्राहकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद नेवगी व सचिव संजय नाईक, समन्वयक बाळ बोर्डेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा