गवळी तिठा परिसरात हॅण्ड बॅग लंपास

गवळी तिठा परिसरात हॅण्ड बॅग लंपास

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद : तपास सुरु

सावंतवाडी
सावंतवाडीतील सारस्वत बँकेच्या एटीएमलगत रोकड हिसकावून पळाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी गवळी तिठा परिसरात डॉक्टरकडे आलेल्या कुडाळ येथील दाम्पत्याची हॅण्ड बॅग चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याबाबत औदुंबर नारायण मर्गज (६९, रा.पांग्रड-कुडाळ ) यांनी सावंतवाडी पोलिसांत तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरीच्या घडलेल्या या प्रकारातील ती बॅग घेऊन जाणारे अज्ञात दोघे युवक सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहीती पोलीस सुतांनी दिली असून त्याबाबत तपास सुरु आहे.
कुडाळ पांग्रड येथील औदुंबर मर्गज हे आपल्या पत्नीसमवेत कुडाळ येथून सावंतवाडी गवळीतिठा परिसरात डॉक्टरकडे आले होते.त्या ठिकाणी त्यांनी आपली बॅग बाजूला खुर्चीवर ठेवली होती. दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या दोघा अज्ञात युवकांनी त्यांची नजर चुकवून ती बॅग घेऊन पलायन केले. या बॅगेत सात हजार रुपये रोकड, लायसन्स व अन्य महत्त्वाची कागदपत्रे होती असे मर्गज यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर संबंधित दोघे युवक हे बावीस वर्ष वयोगटातील असून ते सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानुसार सावंतवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा