दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी जांभवडे पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळीं 10.00वाजता संपन्न झाला.या मेळाव्या मधे जांभवडे गावचे सरपंच मा. अमित मडव सर, व सदस्य कूपवडे गावचे सरपंच मा. दिलीप तवटे सर, व सदस्य, भरणी गावचे सरपंच सौ. अश्विनी मेस्त्री मॅडम व सदस्य, घोडगे गावचे सरपंच सौ. अश्विनी ढवण मॅडम, झाराप विद्यालयचे आरोस्कर सर, जांभवडे नं.1शाळा प्राथमिक मुख्याध्यापक मा. चव्हाण सर तसेच अंजली वालावलकर मॅडम, डॉ . गद्रे,काशीबाई दळवी, जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर व संस्था कर्मचारी इ. मान्यवर उस्थितीत होते. मान्यवरांच्या व तीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जिल्हा समन्वयक शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच वालावलकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.अंकुश गुरव, अमोल तेली, डॉ. प्रसाद मडव यांच्या सहकार्यातून उपस्थितीत बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात आले. तसेच भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दीव्यांगांच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. पुनर्वसन केंद्राच्या वतीने यश मेस्त्री, यांना वॉकर देण्यात आला. व चेतन नाईक यांना व्हील चेअर देण्यात आली. अमित मडव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न असे जाहीर केले.