You are currently viewing ग्रामपंचायतींवर महा विकास आघाडीचेच वर्चस्व…

ग्रामपंचायतींवर महा विकास आघाडीचेच वर्चस्व…

सावंतवाडी तालुक्यातील अकरा ही ग्रामपंचायतींवर महा विकास आघाडीचे च वर्चस्व असेल, असा दावा सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. भाजपचे वरिष्ठ नेते प्रचारार्थ उतरले होते. भाजप विरोधात महा विकास आघाडी ने ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या.
ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असते. स्थानिक पातळीवरील निवडणुका या तेथील कार्यकर्त्यांनीच लढवायच्या असतात. आमच्या नेत्यांनी या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला नाही. तालुका प्रमुख म्हणून आपण समन्वय साधत अकरा ही ग्रामपंचायतींवर महा विकास आघाडीचे वर्चस्व राहण्यासाठी प्रयत्न केले. सर्व ग्रामपंचायतींवर महा विकास आघाडीचेच वर्चस्व असेल असा दावा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =