You are currently viewing पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण प्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व या भागाचे आमदार निलेश राणे यांनी राजकारण बाजूला ठेवून किमान संवेदनशीलपणा दाखवावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे आवाहन

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण प्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व या भागाचे आमदार निलेश राणे यांनी राजकारण बाजूला ठेवून किमान संवेदनशीलपणा दाखवावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे आवाहन

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण प्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व या भागाचे आमदार निलेश राणे यांनी राजकारण बाजूला ठेवून किमान संवेदनशीलपणा दाखवावा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे आवाहन.

कुडाळ

पिंगुळी पाझर तलाव बचावासाठी पिंगुळी ग्रामस्थ जिल्हा परिषद सदस्य गंगाराम साळवेलकर गेल्या चार दिवसापासून पोषणावर बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला संपूर्ण पिंगळी गाव सर्व राजकीय पक्ष , पर्यावरण प्रेमी तसेच जिल्हावासीयांनी देखील पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती उडवली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले असताना. सध्या पाण्याचा एक एक थेंब सुद्धा जपुन वापरवा म्हणून राज्याचे सत्ताधारी मंत्री व प्रशासन जनतेला आवाहन करताना दिसत आहे. असे असून देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र परप्रांतीय बिल्डरांना प्रशासन व सत्ताधारी यांच्याकडून जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत हडपण्यासाठी बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पिंगुळी पाझर तलाव विषयी परप्रांतीय बिल्डराची बाजू मांडताना आमदार निलेश राणे यांनी राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन गंभीर आरोप देखील केले परंतु त्यांनी याभागाचे आमदार म्हणून सद्ध्याच्या भिषण दुष्काळी परिस्थिचे गांभीर्य लक्षात घेऊन पाझर तलावावर अवलंबून असणाऱ्या चार ते पाच हजार पिंगुळी ग्रामस्थांचा विचार करण्याचे आवाहन स्थानिक आमदार तसेच पालकमंत्री यांना मनसेकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा