फोंडाघाट श्रीमाऊली देवस्थानचे दोन मानकरी हरपले
श्रीधर लाड व हर्षद लाड यांचे दुःखद निधन
फोंडाघाट
श्री माऊली देवस्थानचे मानकरी कुटुंबातील, श्रीधर भिकाजी लाड (८०वर्षे) यांचे वार्धक्यातील आजारपणामुळे, तर हर्षद देऊ लाड (५८ वर्षे) यांचे अल्प आजारपणात दुःखद निधन झाले.
श्रीधर लाड यांचा माऊली मंदिरातील विविध उपक्रमामध्ये सहभाग असून, सर्वांच्या हाकेला धावून जात समस्या निवारण करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगे – मुली, सुना,- जावई – नातवंडे असा परिवार आहे.
हर्षद लाड यांचे सुद्धा मंदिर व्यवस्थापनामध्ये तसेच महात्मा गांधी चौक रिक्षा युनियन यांच्या उपक्रमामध्ये दबदबा होता. मित्रत्वाचे संबंध आणि सहकार्य करण्याची वृत्ती, यामुळे ते सुपरिचित होते. फोंडा गावच्या माजी उपसरपंच श्रीमती हर्षदा लाड यांचे ते पती होत.
दोघांच्या दुःखद निधनाबद्दल, पंचक्रोशी व मित्रपरिवारामध्ये, हळहळ व्यक्त होत असून, अंत्ययात्रेत सहभागी होत ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली….
बातमी समजताच सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी स्व. हर्शद लाड यांच्या पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रध्दांजली अर्पण केली.