गगनबावडा- खारेपाटण एसटी उद्यापासून सुरू होणार….

गगनबावडा- खारेपाटण एसटी उद्यापासून सुरू होणार….

वैभववाडी

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली गगनबावडा आगाराची गगनबावडा-खारेपाटण एसटी गुरुवार दि. 22 आँक्टोबर पासून सुरू होणार आहे. अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. उद्या दुपारी २. वाजता गगनबावडा-खारेपाटण एसटी भुईबावडा घाटमार्गे धावणार आहे. त्यामुळे भुईबावडा परिसरातील प्रवाशांसह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा घाटमार्ग तब्बल आठ महिने पूर्णतः ठप्प करण्यात आला होता. दरम्यान गणेशोत्सवाच्या कालावधीत घाटमार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र लहान वाहनांव्यतिरिक्त मोठी वाहने सुरू नव्हती. या मार्गावर दिवसातून दोन फेऱ्या धावणारी गगनबावडा-खारेपाटण एसटी बस महामंडळाने बंद केली होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
भुईबावडा घाटमार्गे एसटी बस सुरू होण्यासाठी गेली कित्येक महिने प्रवाशांसह ग्रामस्थांची मागणी होती. दरम्यान गगनबावडा आगाराचे आगार प्रमुख व्ही. एस. बुवा यांनी वैभववाडी तहसिलदार रामदास झळके आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उभअभियंता श्री. हिवाळे यांच्याशी चर्चा केली.
वैभववाडी तहसिलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता यांनी भुईबावडा घाटमार्गे एसटी बस सुरू करावी. असे लेखी पत्र गगनबावडा आगाराला दिले. आगार प्रमुख श्री. बुवा यांनी उद्यापासून गगनबावडा-खारेपाटण एसटी बस सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा